भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे पाकिस्तानशी लागेबंध असून पुलवामा हल्ला हा घडवून आणलेला आहे, असा घणाघात माणसें अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला आहे. भारताने बालकोटमध्ये केलेल्या एयर स्ट्राईकमध्ये १० लोक जरी ठार झाली असती तरी अभिनंदन भारतात परतले नसते असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी देशावर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळे कपडे परिधान करण्यात व्यस्त होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाचे कुठलेही भाव दिसत नव्हते. त्यामुळे मोदी फकीर आहेत कि बेकीकीर तेच कळत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मोदी पाकिस्तानला जेव्हा नवाज शरीफ यांना केक भरवायला जातात. तेव्हा कुठे जाते यांची देशभक्ती असा सवाल राज ठाकरे यांनी मोदी यांना केला आहे.
राज ठाकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यानां देखील राज ठाकरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. मला ट्रोल करणाऱ्यांना मी भीक घालत नाही. आपल्या आई बहिणींवर टीका करणाऱ्यांना झोडून काढा असा आदेशच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.